4k समाचार
वर्धा जिल्ह्यातील खडकी परिसरात तुळजापूर–नागपूर मार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारमधील दोन महिलांसह 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात सामाजिक वनिकरण नर्सरीजवळ घडला. धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
