4k समाचार दि. 21
सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील वाहनचालकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निकाल दिला आहे. खड्डेमय आणि वाहतूक कोंडी असलेल्या रस्त्यांवर प्रवाशांकडून टोल वसूल करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

केरळ उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि कंत्राटदारांची याचिका फेटाळली. “निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांसाठी नागरिकांना टोल भरण्यास भाग पाडता येणार नाही,” असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

या निर्णयामुळे रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत जबाबदार असलेल्या संस्थांवर मोठा दबाव येणार असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते दुरुस्ती व देखभालीकडे वेगाने लक्ष द्यावे लागणार आहे.
