नवीन बातम्या
7 Best WordPress MCP Servers and Plugins in 2026 (We Tested Them All)
How to Convert Images to WebP in WordPress (Free, No CDN)
Open Channels FM: The Core Principles of the Open Web, Simplified
Free WPVibe Alternative: Easy MCP AI vs WPVibe (Pricing, Limits, Reviews)
WordCamp Central: WordCamp Sylhet 2026: No Swag, All Heart
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!

अमरधाम स्मशानभूमीच्या प्रश्नावर पनवेल महापालिकेत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; स्थलांतराच्या चर्चेला कडाडून विरोध

4kNews कामोठे दि. 3

पनवेल : अमरधाम स्मशानभूमीतील नादुरुस्त शवदाहिनीमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या महासभेत पुन्हा एकदा गाजला. या विषयावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत स्मशानभूमीचे स्थलांतर किंवा बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला तीव्र विरोध दर्शविला.



शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की, अमरधाम स्मशानभूमी हा मूळ पनवेलकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून, गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर नगरसेवकांनीही महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून शवदाहिनीच्या दुरुस्तीची आणि नवीन यंत्रणा बसविण्याची मागणी केली.



महापौर नितीन पाटील यांनीही या प्रश्नाची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली होती. त्यानंतर जुन्या शवदाहिनीचा वापर बंद करून नवीन अत्याधुनिक शवदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव महासभेत चर्चेसाठी मांडण्यात आला.
महासभेत बोलताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेच्या गोषवाऱ्यात शिवसेनेच्या मूळ पाठपुराव्याचा आणि संबंधित पत्रव्यवहाराचा उल्लेख न केल्याबद्दल आक्षेप नोंदविला. श्रेयाचा मुद्दा नसून, शिवसेनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची अधिकृत नोंद महापालिकेच्या अभिलेखात असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 



यावेळी अमरधाम स्मशानभूमी स्थलांतरित किंवा बंद करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही शिवसेनेने कठोर भूमिका मांडली. कोणतेही नैसर्गिक किंवा तांत्रिक कारण पुढे करून स्मशानभूमीचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.
अमरधाम स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणासह नागरिकांना सन्मानपूर्वक आणि अखंड सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेने यावेळी महापालिका प्रशासनाकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top