नवीन बातम्या
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप




4kNews कामोठे दि. 3
पनवेल (प्रतिनिधी) नेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमांमुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होते. जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या समाजोपयोगी उपक्रमातून हीच सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.



भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देण्याऐवजी तसेच बॅनर लावण्याऐवजी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जयेंद्रशेठ जोशी युवा मंच आणि रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे सेक्टर ३६ येथील मसाला मंत्रा हॉल येथे समाजोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन लाभार्थ्यांना वस्तूंचे वाटप केले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना मधुमेह तपासणी किट, ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन वापरासाठी वॉकिंग स्टिक, तर शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. परिसरातील शेकडो नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे गरजू नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला.



कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, नगरसेवक रवी जोशी,  डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, प्रदीप भगत, हॅप्पी सिंग,नगरसेविका शीला भगत, हेमलता गोवारी, आयोजक जयेंद्र जोशी, राजेश गायकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top