नवीन बातम्या
Gutenberg Times: The WordPress 7.2 release squad, WordCamp World, Playground meets WebMCP, and more—Weekend Edition 376
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन
गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका
‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष
सिडकोच्या नोटिसांबाबत कायदेशीर लढ्याची तयारी
सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीची बैठक संपन्न
बदलत्या भारताच्या शिक्षणाची नवी दिशा ठरणार
‘द स्कुल्स ऑफ इंडिया समिट २०२६’चे खोपोलीत आयोजन
Mumbai-3 September 2026(Ajit Mohite) RBI Dy Governor Addr at CII NBFC and HFC Summit
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य

सिडको महामंडळाकडून मौजे डुंगी ग्रामस्थांना पावसाळी स्थलांतरित होण्यासाठी घरभाडे पोटी धनादेश


पनवेल दि. २४ 4k News संजय कदम  सिडको महामंडळाकडून तालुक्यातील मौजे डुंगी ग्रामस्थांना चार महिने पावसाळी स्थलांतरित होण्यासाठी घरभाडे पोटी धनादेश वाटप करण्यात आले . एकूण ११३ कुटुंबियांना वाटप करण्यात आले सिडको तर्फे धनादेशाचे वाटप खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार व पनवेल चे तहसीलदार विजय पाटील यांच्या प्रयत्नाने करण्यात आले. 


मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शिफारी नुसार सिडको नवी मुंबई यांना सुचित करण्यात आले होते. त्यानुसार मौजे पारगाव डुंगी या गावाला तहसीलदार विजय पाटील यांच्या सुचनेनुसार तसेच सदस्य जिल्हा विकास समन्वय व स नियंत्रण समिती दिशा तथा पारगावच्या माजी सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मौजे डुंगी येथे धनादेशाचे वाटप करण्यात आले. 

दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात बांधकामाचे तसेच सामानाचे नुकसान होत आहे. चार महिन्याचे स्थलांतरा होण्यासाठी सदर नुकसानापोटी सिडको महामंडळ तर्फे ग्रामस्थांना चार महिन्याच्या स्थलांतरिता होण्यासाठी घर भाड्यापोटी 50 हजार रुपये दिले जातात. सदर धनादेश तहसीलदार पनवेल यांच्या कार्यालयामार्फत आज ग्रामपंचायत पारगाव येथे ११३ कुटुंबाना वाटप करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी संतोष ठोंबरे, ग्रामसेविका सौ वानखेडे, माजी उपसरपंच निशा पाटील, मनोज दळवी, तलाठी क्षमा पवार, बाळासाहेब नाईक, प्रमोद नाईक, पोलीस पाटील श्रीधर पाटील व ग्रामपंचायत कार्यालयातील क्लार्क प्रमोद म्हात्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top