पनवेल दि.२३ 4k News (संजय कदम): एच.एम. मोटर्स पनवेल, हिरोमोटोकॉर्पचे अधिकृत विक्रेता यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक इ-व्हुटर विडा VX 2 या गाडीचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित अभंग, एच. एम. मोटर्स पार्टनर मनोज सूचक आणि सुनील सूचक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

यावेळी इ-व्हुटर विडा VX 2 गाडीच्या संदर्भात पूर्ण माहिती कंपनीचे सीईओ हर्षल सूचक यांनी देताना सांगितले की या इलेक्ट्रिक इ-व्हुटर दोन व्हेरियंट विडा प्लस व विडा गो आहेत आणि पनवेल नवीमुंबई एच.एम. मोटर्स येथे या इलेक्ट्रिक इ-व्हुटर चे बुकिंग चालू आहे.यामध्ये रिमूव्हबल बॅटरी, 3 रायडिंग मोड, टॉप स्पीड 85 पर किमी, सर्वोच्च रेंज 100 किमी (इकोमोड), संपूर्ण एलईडी प्रकाश, ड्युअल टेलिस्कोपी फ्रंट सस्पेन्शन, आयबीएस ब्रेक सिस्टम, 7 आकर्षित कलर, लॉन्ग आणि कम्फर्ट सीट, पीएम सीएम मोटर, बूट स्पेस, डीसी फास्ट चार्जिंग स्टेशन्स हिरो, जिपीएस फीचर्स, टीबीटी

नेव्हीगेशन, कॉल अलर्ट या सारख्या सोयी सुविधा असून यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. सरकार कडून इलेक्ट्रिक स्कूटर साठी सबसिडी पण मिळून जाते. या परिसरातील सर्व ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सर्वांचे स्वागत एच. एम. मोटर्सचे सीएफओ सिद्धार्थ सूचक व जिनल सूचक (सीईओ) यांनी केले.
