नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

योनिक्स–सनराईज महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा




4k समाचार दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) बॅडमिंटनच्या रोमांचक लढतींचा उत्सव रंगणार आहे. योनिक्स–सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उलवे नोड मढी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात येत आहे. 



राज्यातील सुमारे ३०० खेळाडू खालील गटांमध्ये स्पर्धा करणार असून पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी या गटांमध्ये हि स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे भव्य उद्घाटन समारंभ ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संस्थापक  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते यांच्या हस्ते तर स्पर्धेचा अंतिम सामना व समारोप समारंभ १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१ वाजता आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण ०४ लाखांचे रोख बक्षिस, चषक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अंतिम फेरीतील खेळाडूंकरिता अतिरिक्त दिड लाखांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तरी क्रीडाप्रेमी आणि बॅडमिंटनप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top