पनवेल दि.२३ 4kNews(संजय कदम): मानवता फौंडेशन च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या साठी आज भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ शेकडो पोलीस बांधवानी घेतला.

क्लाउडनाइन हॉस्पिटल नेरूळ व मानवता फाउंडेशन नवी मुंबई यांच्या सहकार्याने सर्व पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे , खजिनदार शीतल मोरे , महाराष्ट्र अध्यक्ष स्वाती पांचाळ , उपाध्यक्ष संजय कामदार , आदेश सिंग , प्रवीण खंदारे , साहिल शेजुल , क्लाउड नाइन हॉस्पिटल चे नागेंद्र यादव , वैभव जाधव उपस्थित होते. यावेळी शेकडो पोलीस बांधवानी आपल्या आरोग्य विषयक विविध तपासण्या करून घेतल्या तसेच तज्ञ डॉक्टरांकडून पुढील उपचाराचे मार्गदर्शन घेतले.
