नवीन बातम्या
आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध : आमदार विक्रांत पाटील
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार
४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती मासिक बैठक संपन्न

4kNews कामोठे
पनवेल दि. ८ ( संजय कदम  ) : पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे हद्दीतील महिला दक्षता समिती सदस्य यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली  होती. 
   या बैठकीला वपोनि गजानन घाडगे  व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांनी विशेष मार्गदर्शक तसेच सूचना केल्या त्यामध्ये  महिला/ मुली यांची सुरक्षा यावर चर्चा/ मार्गदर्शन केले. सायबर क्राईम, नशा मुक्ती चर्चा / मार्गदर्शन व सदर बाबत माहिती मिळाल्यास डायल 112 सकाळ संपर्क करणे. शाळा /कॉलेज येथे विद्यार्थीनी यांचे सुरक्षेच्या दृष्टीने महिला वार्डन नेमणे बाबत. 

उपस्थित शिक्षिका- महिला दक्षता सदस्य यांना सूचना केली आहे. महिला सक्षमीकरण, महिलांचे अडीअडचणी , तक्रारी या करिता पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. महिला दक्षता समिती सदस्य यांच्या अडीअडचणी ऐकून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आलेले आहे . सदर बैठकीत महिला दक्षता समिती सदस्य व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top