खानावळे-ठोंबरेवाडी एकता संघ संचलित माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेचे थाटात उद्घाटन

4kNews दि. 10 कामोठे
पनवेल दि.०७(वार्ताहर): पनवेल तालुक्यातील संघटनेचे कार्यालय गोदरेज सिटी ठोंबरेवाडी, खानावळे येथे ‘महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटनेचे’ मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.  


   अशोक हितेंद्र निकम (जिल्हाध्यक्ष नवी मुंबई व रायगड जिल्हा) यांच्या मार्गदर्शनाखाली खानावळे-ठोंबरेवाडी एकता संघ यांच्या वतीने या शाखेची स्थापना करण्यात आली असून उद्घाटन गोदरेजचे रचीत नेगी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजप पोयंजे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष मंगेश लबडे यांच्यासह किरण लबडे, दिनेश लबडे, रुपेश मांडे, संदेश मांडे, सुभाष ठोंबरे, निखिल सोनावळे, मनोज लबडे,  सचिन लबडे, योगेश शिंदे, रोहित ठाकूर,  प्रविण सोनावळे, स्वप्निल लबडे  आदीसंह संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष महेंद्र लबडे, जिल्हा उपाध्यक्ष नवी मुंबई व रायगड विलास ठोंबरे यांच्यासह मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top