नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीणची धडक कारवाई ; पावणे बारा लाखाचा मुद्देमाल हस्तगत, तीन आरोपी गजाआड


पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः राज्य उतपादन शुल्क विभाग पनवेल ग्रामीणने पेंधरजवळ सापळा लावून एका चार चाकी वाहनामधून व एका खोलीमधून असा मिळून 11 लाख 85 हजार 595 रुपयाचा मद्यसाठा हस्तगत केला असून या प्र्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.


आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख, संचालक, अंमलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे, मा. विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे जि. ठाणे प्रदीप पवार, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग रविकिरण कोले, व मा.उप-अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड- अलिबाग बाबासाहेब भूतकर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग जि. रायगड यांनी तळोजा पोलिस स्टेशन हद्दीत योगेश वजन काट्यासमोर पेंधर तळोजा एमआयडीसी ता. पनवेल जि. रायगड येथे दारुबंदी गुन्ह्याकामी सापळा रचुन एका चारचाकी वाहनामध्ये उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या 17 बाटल्या व 02 मोबाईल असा एकूण 5,44,330 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

नंतर पेंधर येथील एका पत्र्याच्या खोलीमध्ये जाऊन उच्च प्रतीच्या बनावट विदेशी मद्याच्या 54 बाटल्या, विदेशी मद्याच्या 42 बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, बनावट कागदी लेबले व इतर साहित्य असा एकुण रू. 6,41,295 /- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 11,85,595/-इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे 1) संतोष उरथ 2) बिजु उरथ 3) बिनु कल्लूर या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.


सदर कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पनवेल ग्रामीण विभाग अनिल जी. बिराजदार, दुय्यम निरीक्षक बीट क्र. 1- अजित बडदे, दुय्यम निरीक्षक बीट क्र.3 योगेंद्र लोळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गैनिनाथ पालवे, जवान निखील पाटील, जवान वाहनचालक सचिन कदम यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास रविकिरण कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली अजित बडदे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पनवेल ग्रामीण विभाग क्र.1 जि. रायगड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top