नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची यू ई एस उरण शाळेच्या कमेटी मध्ये उपाध्यक्ष म्हणून निवड.

उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील अतिशय नावाजलेली उरण एज्युकेशन सोसायटी  स्कूलअँड जुनिअर  कॉलेज उरणच्या १ली ते १२वी च्या पालक शिक्षक संघ कमेटी ची २२/७/२०२५ रोजी निवडणूक झाली.त्यामध्ये उरण तालुक्यातील युवा समाजसेवक विकास कडू यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली,


या निवडणुकी साठी १ ली ते १२ वी चे पालक प्रतिनिधी आणि शिक्षक व मुख्याधपाक (प्रेन्सिपल )उपस्थित होते. त्यांनी विकास कडू यांना बिन विरोध उपाध्यक्ष म्हणून निवडून दिले. विकास कडू यांनी आगोदर आर के फाउंडेशन जेएनपीव्ही मध्येहि बऱ्याच वर्षे पालकांचे प्रतिनिधित्व कडून पीटीए उपाध्यक्ष, सेक्रेटरी ह्या पदा वर काम केले आहे. त्यांचा पालक प्रतिनिधी म्हणून वेगळाच ठसा निर्माण झाले आहे.




विकास कडू हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सर्वांना सुपरिचित आहेत.विकास कडू हे रायगड जिल्हातील नामांकित चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडचे संस्थापक, अध्यक्ष आहेत त्यांनी जवळ जवळ उरण आणि रायगड जिल्हातील अनेक तालुक्या मध्ये ९ वर्ष समाज सेवेची कामे केली आहेत. त्याची पोचपावती म्हणून त्यांना समाज्याने अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

विकास कडू यांची यूईएस उरण येथे पीटीए उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे समजताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.विकास कडू यांच्याशी संवाद साधला असता विकास कडू म्हणाले की मी सर्व यूईएस उरणच्या सर्व शाळेच्या व ज्युनियर कॉलेज च्या पालक प्रतिनिधी व शिक्षकांचे आभारी आहे. की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून बिन विरोध पालक शिक्षक संघ च्या उपाध्यक्ष म्हणून माझी निवड केली.त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.आणि मी शाळेसाठी व कॉलेजसाठी, पालकांच्या सेवेसाठी सदैव उभा असेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top