भारताची राष्ट्रीय विक्रमवीर आणि आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटू ललिता बाबर यांनी उलवा नोडमध्ये सुरु असलेल्या नमो चषक स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ललिता बाबर यांनी या स्पर्धेच्या भव्य आणि दर्जेदार आयोजनाबद्दल कौतुक केले.

त्यांच्या या भेटीने खेळाडूंमध्ये स्फूर्तीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, स्वप्नील ठाकूर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, देवांशू प्रभाळे, सुधीर ठाकूर, धीरज उलवेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
