उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी आज उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी आमदार महेश बालदी यांनी अजित पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, प्रदीप नाखवा, प्रसाद पाटील, सुरज म्हात्रे, समीर मढवी, अतुल ठाकूर, आकाश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
