शुभम कमर्शिअल प्रिमाईसेस कॉ ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये मोठ्या अपघाताची शक्यता ,
महानगर पालिका, आरोग्य खाते,महावितरण ,महापालिका बांधकाम विभाग प्रशासनाची डोळ्यावर पट्टी

पनवेल प्रतिनिधी
पनवेल महानग पालिका हद्दीतील नवीन पनवेल येथे सर्वात मोठे असे कमर्शिअल कॉप्लेक्स असलेल्या शुभम कमर्शिअल प्रिमाईसेस कॉ ऑपरेटिव्ह सोसायटी च्या आवारात अनेक हॉटेल आणि व्यवसाय चालकांनी नियमांचा भंग करून वापर सुरु केला आहे ,समोरून दिसायला चांगले असलेल्या या बिल्डिंग च्या मागील बाजूस हॉटेल चालकांचा गलथान कारभार असल्याचे दिसून आले आहे समोरून दिसत असलेल्या पदमा ,लक्षमी हॉटेल च्या मागील बाजू पाहिल्यास गलीच्च कारभार असून ते पाहिल्यास कोणी या हॉटेल मध्ये पाणी देखील पिणार नाही या हॉटेल चालकांनी तर बिल्डिंग च्या पार्किंग क्षेत्रात जनरेटर ,गॅस कनेक्शन आणि एम एस इ बी असे एकत्रित असल्याने या ठिकाणी मोठा अपघात ,विस्फोट ,शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असल्याने या कडे महानगर पालिका, अग्निशमन विभाग ,आरोग्य खाते,महावितरण ,महापालिका बांधकाम विभाग ,यांनी संयुक्तिक कारवाई करावी अशी बिल्डिंग च्या सभासदांनी मागणी केली आहे .

नवीन पनवेल मधील सर्वात प्रसिद्ध असे सेक्टर ११ मधील प्लॉट नंबर १ ते ३ मध्ये शुभम कमर्शिअल प्रिमाईसेस कॉ ऑपरेटिव्ह सोसायटी वसलेली आहे या बिल्डिंग च्या आवारात पदमा ,लक्ष्मी असे हॉटेल आहेत त्या व्यतिरिक्त अनेक छोटे मोठे हॉटेल आहेत या हॉटेल चालकांनी इमारतीच्या मागील बाजूस सावळा गोंधळ घातला असून एकाच ठिकाणी जनरेटर, गॅस कनेक्शन आणि एम एस इ बी डीपी मीटर बॉक्स असे असल्याने आगीचा भडका उडाल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होऊ शकते

या ठिकाणी काही सभासदांचे कार्यालय पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असून त्यांच्या विद्युत मीटर कडे जाण्यासाठी देखील जागा न सोडल्याने येथील काही सभासदांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथे महावितरण च्या अनेक केबल चे जाळे असून सगळे अस्ताव्यस्त आहे या हॉटेल च्या मागील बाजूस एवढी अस्वच्छता आहे कि गटाराजवळच भाज्या कापल्या जातात त्याच ठिकाणी रिकाम्या दारू च्या बाटल्यांचा

साठा केल्याने मच्छर माश्या , अनेक किटाणू ,उंदीर, घुशी यांचा वावर असल्याने या हॉटेल मध्ये टेबल वर आलेले पदार्थ जरी स्वच्छ ,चमचमीत दिसत असले तरी मागील बाजूस घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामळे या ठिकाणी महानगरपालिका, आरोग्य खाते,महावितरण , अग्निशमन विभाग ,अन्न व आरोग्य प्रशासन , महापालिका बांधकाम विभाग ,यांनी संयुक्तिक कारवाई करावी अशी बिल्डिंग च्या सभासदांनी मागणी केली आहे .
सर्व विभागांनी तपासणी केल्याशिवाय परवाने नूतनीकरण करू नये अशी हि मागणी होऊ लागली आहे
