नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत.



उरण दि २5 (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार अशी तीन गावे आताच्या प्रभाग रचनेत वगळण्यात आलेली आहेत. 

ती पुन्हा एकदा नवघर जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात यावी.त्याचबरोबर काळा धोंडा हे चाणजे ग्रामपंचयातीमध्ये समाविष्ठ असल्यामुळे तो भाग चाणजे जिल्हा परिषद प्रभागात घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.भारतीय लोकसंख्येची जनगणना मागील बारा वर्षे झाली नसल्याकारणाने उरण मतदार संघातील जिल्हा परिषद प्रभाग रचनेमध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. 

तरी नवघर जिल्हा परिषदेत पारंपारिक असलेले प्रभागातील गावे न वगळता नव्याने २०१७ च्या निवडणुकीत अगोदर असलेले प्रभाग रचना तसेच ठेवण्यात यावी अशी मागणी तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून व हरकत घेऊन जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top