नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  

4kNews कामोठे दि. 13
मुंबई प्रतिनिधी अजित मोहिते आज दि. 05 –  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाच्या कारकीर्दीला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार येत्या दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत यशवंतराव प्रतिष्ठाणच्या 6 व्या मजल्यावरील सभागृहात  हा  सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. 


केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचा दशकपुर्तीचा या भव्य सत्कार सोहळयास केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, ज्येष्ठ नेते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, समाज कल्याणचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट, आदि अनेक मान्यंवर या सत्कार सोहळयास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार आदि मान्यंवर नेत्यांनी या पत्रकार परिषदेत संबोधीत केले.  


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुन साकार झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एकही प्रतिनिधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान मिळवु शकलेला नव्हता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानुन आंबेडकरी चळवळीत संघर्षशील जीवन जगणारे रामदास आठवले हे  दलित पँथर आणि भारतीय दलित पँथरपासुन ते रिपब्लिकन पक्षाचे संघटनेच्या माध्यमातुन ते देशभर कार्यरत राहिले आहेत.

त्या फलस्वरुप महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक भिमसैनिक म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा वारसदार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादाने भारत सरकारमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात सलग तिस-यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाचा बहुमान मिळवणारे एकमेव रिपब्लिकन नेते ठरलेले आहेत.. एकाच सामाजिक न्याय मंत्रालय खात्याचे सलग तीनदा केंद्रीय राज्यमंत्री झाले. 

हा एक त्यांचा विक्रम असुन आंबेडकरी चळवळीचे ते एकमेव रिपब्लिकन नेते आहेत. भारत सरकारमध्ये तीनवेळा केंद्रीय राज्यमंत्री पदाचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या 10 वर्षांचा कार्यकाल नुकताच पुर्ण झाला असल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दशकपूर्ती उत्सव सोहळा रुपाने साजरी करण्याचा निर्णय मुंबई प्र्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात आला. 

त्यानुसार येत्या 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून त्या सोहळयास अनेक मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आलेले आहे. या सोहळयास मुंबई ठाण्यातील आंबेडकरी जनतेने मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नेत्यांनी केले आहे. 
अविनाश महातेकर  (राष्ट्रीय सरचिटणीस)     
गौतम सोनवणे (महाराष्ट्र राज्य सरचिटणीस) 
सिध्दार्थ कासारे   (मुंबई प्रदेश अध्यक्ष)                          विवेक पवार  (मुंबई प्रदेश सरचिटणीस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top