पनवेल – इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी भूमिका परमार यांची 2025- 2026सालासाठी निवड झाली असून, नुकताच पदग्रहण समारंभ तथास्तू हॉल येथे पार पडला.

क्लबच्या सेक्रेटरीपदी दिपाली आडमुठे, व्हाईस प्रेसिडेंट उल्का धुरी,आयपीपी कल्पना कोठारी, खजिनदार अर्चना राजे,आयएसओ सुनिता गुर्जर ,एडिटर राजश्री नाईक, सि पीसी शितल वंळजू , जॉईट सेक्रेटरी अंजना गांधी, तर सल्लागार समितीमध्ये सुनिता आडमुठे, साधना धारगळकर, स्नेहल वाडकर, विद्या चव्हाण, ममता राजीवन, छाया ठक्कर,दर्शना निकम यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्षा कल्पना कोठारी यांनी वर्षभर केलेल्या सहकार्याबद्दल सदस्याचे आभार मानले.
