4k समाचार
पनवेल दि. २० ( वार्ताहर ) : पनवेल जवळील कळंबोली सर्कल ते टी पॉईंट येथे रस्त्यात मोठा खड्डा पडला होता त्यामुळे कमीत कमी 1 तास मध्ये 7 ते 8 बाईक वाले आपल्या कुटूंब सहीत पडले होते अशी माहिती मिळताच शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शिवसैनिक अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले .

यावेळी कामोठे शिवसेना शहर संघटक कामोठे संतोष गोळे व उप शहर प्रमुख कामोठे गणेश खांडगे,व रवी रचना बिल्डींग मधील सचिन किंतुकले तसेच इतर नागरिकांनी त्यानी ठिकाणी पोहोचून स्थानिक पोलिस व वाहतूक शाखेशी संपर्क साधून त्याठिकाणी बेरिकेट लावले आणि जे बाईक वरून अपघात झाले होते त्यामधील काही नागरिकांशी एमजीएम व कळंबोली मधील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे जाऊन रुग्णाशी संवाद साधला.शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव बचावले आहेत .
