नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती

4kNews कामोठे
पनवेल दि.  10 ( वार्ताहर ) :पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती देण्यात आली आहे .  


   जितेंद्र विठ्ठल म्हात्रे हे १/०१/१९९३ साली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले .प्रथम त्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कामकाज पहिले त्यानंतर त्याची बदली नवी मुंबई आयुक्तालयात झाली . यामध्ये विशेष शाखा ,खंडणी विरोधी पथक , गुन्हेशाखा विविध पोलीस ठाणे येथे कार्यरत राहून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला या कामाची दखल शासनाने घेऊन त्यांना २०२५ साली राष्ट्रपती पदक देण्यात आले . सध्या ते पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती देण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top