नवीन बातम्या
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन

4kNews कामोठे दि. 3

पनवेल (प्रतिनिधी)  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेलच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ च्या भव्य मूट कोर्टचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता खांदा कॉलनी येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. 


या कार्यक्रमास प्रमुख पाहून म्हणून पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.


जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने शिक्षणाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य उभे केले असून, उच्च शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा सातत्याने भर राहिला आहे. संस्थेने १९९२ मध्ये आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली असून आज विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार केला जात आहे. भगुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ हे संस्थेच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल असून, कायद्याच्या विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी आणि भविष्यातील कायदेपेशासाठी त्यांची सक्षम तयारी व्हावी, 

या उद्देशाने मूट कोर्ट सारख्या आधुनिक सुविधेला महत्व आहे. भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ या कॉलेजची स्थापना शैक्षणिक वर्ष २००९-१० मध्ये करण्यात आली असून ते मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या मान्यतेखाली कार्यरत आहे. तरी हितचिंतक नागरिक, पालकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य परेश ठाकूर यांनी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top