नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

वैधमापनशास्त्र यंत्रणा विभाग नवी मुंबई  कडून  राष्ट्रीय  ग्राहक हक्क दिन  2024  वाशी येथे संपन्न


पनवेल  दि. 24 (4kNews) : राष्ट्रीय  ग्राहक हक्क  दिनाच्या  निमित्ताने महाराष्ट्र  राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग तसेच वैध मापन शास्त्र यंत्रणा विभाग नवी मुंबई  कडून  वाशी येथे  नागरिकांना ग्राहक हक्कांविषयी तसेच वस्तूंवरील वजन इ. माहिती बाबत प्रबोधन माहिती देऊन जनजागृती उद्देशाने आयोजन   वैध मापन शास्त्र यंत्रणा  वाशी नवी मुंबई  विभागमार्फत करण्यात आले होते.


बाजारात विक्रीसाठी असणार्‍या वस्तूंच्या आवरणावर एमआरपी, वजन, उत्पादनाची तारीख,पॅकेर्सवर पूर्ण पत्ता ,ग्राहक, ई – मेल, दूरध्वनी क्रमांक इ. प्रिंट करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र नागरिक ह्या सूचना तपासून घेत नसल्याने अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. शासनाच्या वैधमापन शास्त्र विभाग अशा व्यापार्‍यांवर लक्ष ठेवते. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची व विक्रेत्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी दरवर्षी  24 डिसेम्बर  हा दिवस राष्ट्रीय  ग्राहक हक्क दिन   म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी ग्राहकहिताची जनजागृती करणारे कार्यक्रम राबविले जातात. या जनजागृतीचा एक भाग म्हणून  वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने स्टॉल लावून  वजनकाटे,   मापे, आवेष्ठित वस्तू उत्पादनांवरील आवश्यक माहिती इ. बद्दल प्रात्याक्षिके माहितीसह देण्यात आली. तसेच ग्राहक जनजागृती माहितीपत्रके वाटण्यात आली. यावेळी   वैध मापन शास्त्र यंत्रणा  उपनियंत्रक, ठाणे  जिल्हा क्रमांक 2  सुहास कुटे    यांचे मार्गदर्शनाखाली  वाशी  1 आणि 4 विभागाचे निरीक्षक एम. एच तडवी वाशी 2  विभागाचे  निरीक्षक हेमंत कुलथे ,    यांच्या उपस्थितीत  कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रम  यशस्वी  करण्यासाठी  क्षेत्र सहा.  अनंत पाडवी, कर्मचारी रमाकांत गाडेकर  यांनी परिश्रम घेतले,  यावेळी    राष्ट्रीय  ग्राहक हक्क दिन  नागरीकांनी  उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला. उपयुक्त माहिती मिळाली म्हणून यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top