पनवेल दि. 24 (वार्ताहर)4kNews : पनवेल शहरात उभारण्यात आलेल्या शिवसेना पनवेल तालुका जनसंपर्क कार्यालय तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पनवेल या कार्यालयास खा.श्रीरंग बारणे यांनी भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

यावेळी कर्जत उरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भगत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरत अनुसया ज्ञानदेव जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महानगर प्रमुख राजाभाऊ मारुती नलावडे, मराठा समन्वयक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष देविदास राजळे पाटील, शिवसेनेचे दत्तात्रेय कोंडीलकर, मेहबूब शेख, रुपेश राऊत, संतोष वाहुळे, संजय बागडे, सुनील फाळके इतर शिवसैनिक उपस्थित होते.
