नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद


4kNews कामोठे दि. 6

पनवेल (प्रतिनिधी) पनवेलचे संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. याच भावनेतून महिला मोर्चाच्या पनवेल शहर मंडल अध्यक्षा तथा पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे-समेळ यांनी बालग्राम, पनवेल येथील अनाथाश्रमाला जीवनोपयोगी वस्तूंची मदत देत सामाजिक बांधिलकी जपली. 



“वाढदिवसानिमित्त फुलं, हार, तुरे आणि बॅनरवर अनावश्यक खर्च न करता लोकोपयोगी कामात सहभागी व्हा,” असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रुचिता लोंढे-समेळ, चिन्मय समेळ, प्राजक्ता पाटील यांनी बालग्रामला भेट देऊन तेथील ४० अनाथ मुलांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन जीवनोपयोगी वस्तूंची मदत केली. यावेळी बालग्रामचे विनायक पाटील हे सुद्धा उपस्थित होते. 

वाढदिवसाचा आनंद केवळ शुभेच्छा आणि सत्कारापुरता मर्यादित न ठेवता गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्यातून वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्याला नवी दिशा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top