नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

स्क्रीन अवॉर्ड्स 2025: यूट्यूबसोबत एका महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे डिजिटल-फर्स्ट पर्व





4k समाचार दि. 10
नवी मुंबई/पनवेल(प्रतिनिधी) इंडियन एक्सप्रेस ग्रुपअभिमानाने यूट्यूबवरस्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 चा नवा अविष्कार सादर करत आहे. स्क्रीन ॲवॉर्ड्स हा भारतीय सिनेमाच्या आणि कथाकथनाच्या सर्वात प्रतिष्ठित उत्सवांपैकी एक आहे.हा फक्त आणखी एक ॲवॉर्ड शो नाही.स्क्रीन ॲवॉर्ड्स 2025 हा संपादकीय विश्वासार्हता, सांस्कृतिक वारसा आणि डिजिटल पोहोच यांचा शक्तिशाली संगम आहे. 



   इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या पत्रकारिता प्रथम (जर्नलिझम-फर्स्ट) तत्त्वज्ञानावर आधारित हे पुरस्कार प्रामाणिकपणा आणि गुणवत्तेचे द्योतक आहेत. एक स्वतंत्र, ना-नफा तत्वावरील संस्था स्क्रीन अकादमीद्वारेविजेत्यांची निवड केली जाते. या अकादमीमध्ये ख्यातनाम चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज सहभागी आहेत. त्यांचा उद्देश खऱ्या उत्कृष्टतेला ओळख देणे आहे. 



     इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका म्हणाले:“जिथे केवळ कलेक्शनपेक्षा सर्जनशीलतेचा अधिक उत्सव साजरा केला जातो असे व्यासपीठ भारतीय सिनेमाला हवेच आहे.  आपल्या कथाकारांकडे 1.4 अब्ज स्वप्न आहेत. ही स्वप्न आहेत परंपरेशी जोडलेली आणि रोमांचक भविष्याकडे धावणारी. हा ॲवॉर्ड, हे पुरस्कार त्या भावनेला सन्मान देईल आणि भारताच्या सर्वात धाडसी, मूळ प्रतिभेवर प्रकाश टाकेल. या उपक्रमासाठी यूट्यूब ही आमच्यासारखाच उत्साही आहे याचा आम्हाला आनंद आहे.”  



डिजिटल-फर्स्ट दृष्टीकोनातून आशय आणि फॉरमॅट-प्रकार हाताळतस्क्रीन ॲवॉर्ड्सयूट्यूबवर सादर होतील. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना त्यांचा आनंद लुटता येईल. पहिल्यांदाच, बॉलीवूडमधील सर्वात मोठे स्टार्स यूट्यूबवरील प्रभावशाली क्रिएटर्ससोबत स्पॉटलाइट शेअर करतील. रेड कार्पेट, बिहाइंड-द-सीन्स कंटेंटपासून ते कथाकार, निर्माता, कलाकार प्रेरित स्टोरीटेलिंग आणि चाहत्यांच्या सहभागापर्यंतते या तीन महिन्यांच्या फेस्टिव्हलच्या प्रत्येक टप्प्यात सामील असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top