पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील गार्डनमध्ये बसविण्यात आलेल्या गार्डनमधील ग्रास आणि वॉकींग ट्रॅक या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करणार ग्वाही स्थानिक मा.नगरसेवक विकास घरत यांनी या भागातील नागरिकांशी चर्चा करताना केली.

कामोठे सेक्टर 36 मधील नागरिकांनी प्लॉट 17- गार्डन मध्ये बसविलेल्या जिमच्या मेंटेनन्स बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच आता लहान मुलांची खेळणी बसविले याबाबत नागरिकांनी मा.नगरसेवक विकास घरत यांचे आभार मानले. आणि गार्डन मधील ग्रास आणि वॉकिंग ट्रॅक या समस्येबद्दल चर्चा करून लवकरात लवकर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
