पनवेल ता.19(बातमीदार) : दिल्ली पब्लिक स्कूल, पनवेल चा दिमाखदार वार्षिक स्नेहसंमेलन दिवस ता.17 रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हा शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि कठोर परिश्रमांचा भव्य उत्सव होता.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत, अनुज अग्रवाल व्हाईस चेयरमन डीपीएस, शाळेच्या प्राचार्या साक्षी मिश्रा व संस्थेचे संचालक जितेंद्र सोनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात झाले. संस्कृतीक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना करून करण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी माॅन्टी क्रिस्टो या नाटकाची निर्मिती करून आपले आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे दर्शन करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. ज्यात नाटक ,नृत्य,गायन याचा समावेश होता. या कार्यक्रमाला शेकडो पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला गुण व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
