4k समाचार दि. 28
तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. नुकत्याच जुलै महिन्यात एका तरुणाच्या हातावरून वाहनाचे चाक गेल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला आहे.

सीईटीपी प्रकल्पाशेजारील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ३६ वर्षीय विवेक तिवारी (रहिवासी – टिटवाळा, ठाणे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विवेक तिवारी हे दुचाकीवरून रोडपाली येथे जात असताना, सीईटीपीसमोर एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्यांचा पाय डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.

तळोजा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
