4k समाचार
पनवेल दि. 06 ( वार्ताहर ) : प्रकल्पग्रस्तांचे कणखर नेतृत्व, स्त्री भ्रूण हत्ये विरोधी कायद्याचे जनक तसेच सिडकोविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे पनवेल नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष, ५ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिलेले लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्यावर प्रेम करणारे पनवेल, उरण आणि नवीमुंबई परिसरातील नागरिक नव्याने उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे म्हणून अनेक प्रकारची आंदोलने करीत आहेत.

पर्यायाने नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळणार असल्याचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असून येत्या ३ महिन्यात विमानतळाच्या नावाबाबत कायदेशीर प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच येत्या ८ तारखेला विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडणार असेल तर विमानतळाला लोकनेते दिबांचे नाव देखील याच उदघाटन सोहळ्यात मोदींनी केले पाहिजे आणि त्यानंतर ३ महिने सोडा पण ३ वर्षे कागदपत्रांची कामे करत बसा, असा इशारा वजा मागणी उद्योजक विजय शांताई नामदेव शिरढोणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.

तसेच उरण तालुक्यातील फुंडे येथे प्रकल्पग्रस्तांच्या राखीव भूखंडावर स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने ५ एकर जागेत अभियांत्रिकी महाविद्यालय उभारून याठिकाणी स्व. लोकनेते दि. बा. पाटील त्यांचे स्मारक देखील स्वखर्चाने उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळी आपल्या पनवेल तालुक्यातील गावे ही विमानतळ बाधित होणार होता, त्यासाठी सिडकोच्यावतीने सर्व्हे करण्यात आला. त्याचवेळी लोकनेते दि. बा. पाटील हे हयात असतानाच पहिले विमानतळाला दिबांचे नाव लावले गेले पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडली. माझे वडील नामदेव शिरढोणकर हे दिबांच्या अगदी जवळचे सहकारी होते, त्यामुळे मलाही १८ वर्षे दिबांच्या सहवासात काम करण्याचे भाग्य लाभले. ज्या पद्धतीने माझ्या वडिलांकडून दिबांच्या नावासाठी लागेल तेवढा निधी आपल्या वडिलोपार्जित जमिनीमधून उपलब्ध करून दिबांच्या नावासाठी काहीतरी कर, अशा सूचना मिळाल्या, त्यावेळेपासून मी फुंडे गावच्या हद्दीतील प्रकल्पग्रस्तांसाठी मिळालेल्या ५ एकर जागेत प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या नावाने अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचे ठरविले होते. मात्र मधल्या १३ वर्षांच्या काळात हे शक्य होऊ शकले नव्हते.

अखेर आता ती वेळ आली असून या परिसराला उरण – शिवभूमी – रायगड असे नाव देण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालय आणि या महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे स्मारक उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी विजय शिरढोणकर यांना दिबांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तुम्ही केलेल्या पहिल्या मागणीला यश मिळाल्याबाबतची त्यांची भावना विचारली असता, त्यांनी विमानतळ मागणीसाठी दिबांच्या नावाचा उल्लेख केला होता, ती बाब समोर आणताना सदरबाबत स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने प्रस्तावित विमानतळ व्हावे ही मागणी सन २००८ साली केली. माझ्या मागणीचा विचार करून पनवेल – उरण – नवीमुंबई परिसरातील असंख्य नागरिकांनी अनेक प्रकारची आंदोलने केली. या आंदोलनाची दखल अखेर विमानतळ प्राधिकरण, सिडको कार्यालय, राज्य सरकारला घ्यावीच लागली. तद्नंतर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा जनआक्रोश पहिल्यानंतर अखेर केंद्र सरकार देखील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव येत्या ३ महिन्यात देणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच येत्या ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार असेल तर याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळाचे नाव जाहीर करावे, आणि काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती पुढे सुरु ठेवावी, अशी मागणी उद्योजक विजय शांताई नामदेव शिरढोणकर यांनी बोलताना केली आहे.
