4k समाचार
पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : कामोठे वसाहतीतील सेक्टर 35 येथील मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष आक्रमक झाला असून तातडीने पनवेल महानगरपालिकेने आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शिवसेने कडून करण्यात आली आहे .

या संदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कामोठे उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी यांची भेट घेऊन प्रभागातील सेक्टर 35 येथील मायाक्का मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान परिसरात असलेले सार्वजनिक शौचालय सध्या अत्यंत खराब स्थितीत आहे. शौचालयाच्या बांधकामाची तोडफोड झालेली असून ते विद्रूप अवस्थेत आहे.पाणीपुरवठ्याची योग्य व्यवस्था नाही. साफसफाईचे नियोजन पूर्णपणे बिघडलेले आहे.परिसरात कचरा व घाण साचल्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे शिवसेना (उद्धव वाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की , सदर शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.योग्य पद्धतीने पाणीपुरवठा व स्वच्छतेची व्यवस्था सुरू ठेवावी. डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने फवारणी व स्वच्छता मोहीम राबवावी. ही बाब तातडीने लक्षात घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक ती कारवाई अशी मागणी उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी निवेदना मार्फत केली आहे .
