पनवेल, दि.15 (संजय कदम) ः कामगार क्षेत्रात अल्पवधीत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे कामगार नेते संजय कलावती वासुदेव पवार यांना नुकताच कोल्हापूर रत्न 2025 हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
संजय पवार यांनी मागील 25 वर्ष कामगार व सामाजिक क्षेत्रात काम केले आहे.

विविध आंदोलने केली आहेत. तसेच माता भगिनींवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. कायदेशीर मदत, व्यसनमुक्ती, निराधार महिलांना मदत आदी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल पनवेल या ठिकाणी कोल्हापूर रहिवाशी संघाकडून घेण्यात आली.

व त्यांना पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे मा.सभापती बाळासाहेब पाटील, इंडाल कंपनीचे रिटायर्ड जनरल मॅनेजर एस.टी.नाईक आदींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
