4k समाचार दि. 5
कामोठे : प्रतिनिधी
मानवतेचा हात पुढे करत समाजातील गरजूंसाठी सदैव तत्पर असलेली कामोठे रहिवासी सामाजिक संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. पोपट दादा आवारे यांच्या प्रेरणेतून आणि कामोठेतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संस्था यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी जीवनावश्यक वस्तूंचा मोठा संच रवाना करण्यात आला.

गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे जलमय झाली, घरे उद्ध्वस्त झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्याचा निर्धार करत पोपट दादा आवारे यांनी मदत संकलन मोहिमेचा शुभारंभ केला.
कामोठेतील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत धान्य, कपडे, ब्लँकेट, औषधे, सुकामेवा, बिस्किटे, पिण्याचे पाणी अशा जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या.

📦 या वस्तूंचे नियोजनबद्ध पॅकिंग करून आज सकाळी बीड जिल्ह्यासाठी मदतवाहन रवाना करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्थानिक नागरिक, तसेच अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी श्री. पोपट दादा आवारे म्हणाले,
मानवतेचा धर्म मोठा आहे. आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये, थंडीने किंवा संकटाने थरथरू नये — हीच आमची भावना आहे. या उपक्रमात कामोठेकरांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि एकोप्याची भावना अभिमानास्पद आहे.”
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, कामोठे रहिवासी सामाजिक संस्था पुन्हा एकदा समाजकारणाच्या माध्यमातून माणुसकीची खरी ओळख ठरली आहे.
