नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यंदाची महानगरपालिका निवडणूक लढणार

4k समाचार
पनवेल, दि.15  (वार्ताहर) :  गेल्या अनेक वर्षापासून खांदा वसाहत व परिसरात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खांदा वसाहत शहरप्रमुख सदानंद शिर्के यंदाची महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत .  


त्यांनी गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करताना असंख्य गरजूंना दरवर्षी वह्या वाटप केले . त्याचप्रमाणे महानगरपालिकेने लादलेल्या वाढीव टॅक्स संदर्भात आंदोलन पाणि संदर्भात वेळोवेळी आंदोलने  केली आहेत . महानगरपालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे या भागातील रस्त्यांना पडणारे खड्डे , वाहते गटार , पाण्याचा प्रश्न आदी नागरी प्रश्नावर पनवेल महानगरपालिका व सिडको विरोधात जनआंदोलन करून न्याय मिळून दिला आहे

. तसेच कॉलेज, शाळा, पोलीस स्टेशन ,महानगरपालिका अन्य सर्व कामांसाठी अग्रेसर होऊन त्यांनी काम केले आहे . ते शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ गेली  35 वर्ष कार्यरत आहेत . त्याचप्रमाणे सकल मराठा समाज खांदा कॉलनी सचिव, विशाल को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी अध्यक्ष, अशोक को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी उपाध्यक्ष, नवजीवन मित्र मंडळ अध्यक्ष, कोकण विकास सामाजिक संस्थापक अध्यक्ष म्हणून कामकाज पहात आहेत . त्यांनी महानगरपालिकैची  २०१७ साली निवडणूक लढवली आहे पण त्यांचा त्यात निसटता पराभव झाला होता . परंतु यंदा कोणत्याही परिस्थितीत त्यांना विजयी करण्याचा चंग महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी बांधला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top