नवीन बातम्या
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या
नैना प्रकल्पग्रस्तांचा १३ वर्षांचा संघर्ष; शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; प्रलंबित प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन
जय माताजी महिला भजन मंडळाकडून गो-रक्षण संस्थेला ५५ हजारांची देणगी
राहुल शिवाजी बनसोडे यांचा ‘बनसोडे एंटरप्रायजेस’च्या माध्यमातून बौद्ध वस्तूंचा व्यवसाय
बुद्धमूर्तींपासून धम्मसाहित्यापर्यंत विविध वस्तू उपलब्ध; सांगली आणि नवी मुंबईत व्यवसायाचा विस्तार
पनवेलमध्ये राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा; सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा सह्याद्री संस्थेतर्फे आतिष साळवी  आणी नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते  श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!
राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

शिवसेनेच्या युवासेना पनवेल शहर अध्यक्षपदी कपिल भरत कुरघोडे यांची नियुक्ती




4kNews कामोठे दि. 8
पनवेल / प्रतिनिधी : –
शिवसेना पनवेल महानगर मधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली, खारघर येथील युवासेनेच्या शहर अध्यक्ष, सचिव, समन्वयक, उपाध्यक्ष तसेच महानगर उपाध्यक्ष या पदांच्या नेमणुका युवासेना मध्यवर्ती कार्यालय येथून करण्यात आल्या आहेत./



पनवेल मधील शिवसैनिक कपिल भरत कुरघोडे यांची पनवेल शहर अध्यक्षपदी तर विनीत पाटील यांची शहर सचिव पदी नेमणूक करण्यात आल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. 



मूळचे शिवसैनिक व पत्रकार असलेले कै.भरत कुरघोडे यांचे कपिल कुरघोडे हे सुपुत्र असून त्यांचा परिवार देखील शिवसेनेशी फार पूर्वीपासून जोडला गेला आहे. त्यांना मिळालेल्या पनवेल युवासेना अध्यक्षपदामुळे पनवेल मधील शिवसैनिक, युवा शिवसैनिक, कार्यकर्ते यांच्यामधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर पनवेल मधील शिवसेना, युवासेना, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top