पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात तृतीयपंथीचा मृत्यू झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे.
रोडपाली सिग्नल येथे पनवेल-मुंब्रा रोडवर कळंबोली येथे एका अज्ञात वाहनाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने, हयगयीने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून एका अज्ञात तृतीयपंथीला धडक मारली.

त्यात तृतीयपंथीला गंभीर जखमा होवून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अज्ञात वाहन चालकाविरोधाात कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी सदर तृतीयपंथीचा रंग सावळा, अंगाने सडपातळ, केस काळे मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ, उंची अंदाजे 5 फुट 7 इंच असून, नाकात कील, अंगात नेसून लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, पिवळ्या रंगाच परकर घातलेला आहे.

सदर तृतीयपंथीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक एन.एस.शिरसकर मो.नं.9594939780 येथे संपर्क साधावा.
