नवीन बातम्या
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी बांधवांचे मुंबईत चीनच्या नव्या जातीय एकात्मता धोरणाविरोधात तीव्र आंदोलन
तिबेटी भाषा, संस्कृती आणि धार्मिक ओळख धोक्यात; भारतात तिबेट हाऊस स्थापन करण्याची मागणी
समाजसेवेच्या व्यापक उद्देशाने ‘केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशन’ची स्थापना
रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न
आधारगृहातून बेपत्ता झालेल्या ६९ वर्षीय वृद्धाचा शोध
खारघरच्या पाणीटंचाईवरून सिडकोला नागरिकांचा घेराव; तीन तास आंदोलन, दोन तास चर्चेनंतर १५ दिवसांत उपाययोजनांचे लेखी आश्वासन

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न

पनवेल दि.6 (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पनवेल, सर्जनशील शब्दवेध साहित्य संघ पनवेल व के. आ.बांठिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नंदकुमार शिंदे लिखित ‘स्नेहबंध’ या एकांकिकेचा पुस्तक प्रकाशन सोहळा व कवी संमेलन रविवारी सायंकाळी बांठिया विद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात साजरे झाले.   


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक को.म.सा.प.पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी केले.बांठिया विद्यालयाचे प्राचार्य शेंडगे सर यांनी कार्यक्रमाचे उद्घघाटन केले. कवी गझलकार व समीक्षक रोहिदास पोटे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिका ॲड.सुनिता जोशी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुभाष कटक दौंड,कवयित्री व उप शिक्षणाधिकारी दीपाली दिवेकर व कवयित्री माधुरी  मोतीलिंग यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी आपल्या अध्यक्षपर भाषणात पुस्तकाची समीक्षा केली. 

कार्यक्रम प्रसंगी सर्जनशील शब्दवेल साहित्य संघाचे अध्यक्ष प्रवीण बोपूलकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवाशक्ती प्रमुख को.म.सा.प. पनवेलच्या प्रा.सौ. श्रद्धा तारे यांनी नेहमीच्या सफाईने केले.सुभाष कुडके यांच्या आभार प्रदर्शनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.   
या कार्यक्रमानंतर लगेच कवी संमेलन सुरू झाले.या संमेलनात २५ कवींनी आपल्या स्व-रचित कविता सादर केल्या.त्यातील १० कवींचा उत्कृष्ट सादरी करणाबाबत सत्कार करण्यात आला.   
कार्यक्रमादरम्यान नागनाथ डोलारे,काशिनाथ जाधव व उत्तमराव तरकसे यांना विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांच्या काव्य गायनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top