नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

आधारगृहातून बेपत्ता झालेल्या ६९ वर्षीय वृद्धाचा शोध

4kNews कामोठे
पनवेल, दि. 5 (वार्ताहर) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरे येथील शांतीवन परिसरातील राजीव रंजन आधारगृहातून बेपत्ता झालेल्या ६९ वर्षीय वृद्धाचा शोध सुरू असून, त्यांच्याबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पनवेल तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्जिद मेहबूब कुरेशी (वय ६९) हे कुष्ठरोग निवारण समिती संचलित राजीव रंजन आधारगृह, शांतीवन, नेरे (ता. पनवेल) येथून बेपत्ता झाले.  बेपत्ता वृद्धाची उंची सुमारे ५ फूट २ इंच, गोरा वर्ण, मध्यम बांधा, पांढरे केस, काळे डोळे आणि गोल चेहरा अशी ओळख आहे. बेपत्ता होताना त्यांच्या अंगात पिवळ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा टी-शर्ट, राखाडी रंगाची हाफ पॅन्ट होती. तसेच गळ्यात काळ्या रंगाचा दोरा व ताईत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोणे करीत आहेत. संबंधित वृद्ध व्यक्तीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ पनवेल तालुका पोलीस ठाणे (६८५९२५४९९२) किंवा पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोणे (९०९६९१३६७०) यांच्याशी संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top