नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

पनवेल-खारघर आरटीओतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा

4kNews कामोठे
आंदोलनास परवानगी नाकारली; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहाबाज पटेल यांचे परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन
पनवेल, दि. 22(वार्ताहर) :   प्रादेशिक परिवहन विभागाच्या पनवेल-खारघर येथील कार्यालयात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असलेल्या एडीसीसंदर्भातील कथित गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या प्रकारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी नियोजित आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी माघार न घेता प्रादेशिक परिवहन विभागाच्या परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहाबाज पटेल यांनी सविस्तर निवेदन सादर केले.


पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे जिल्हाध्यक्ष शहाबाज पटेल यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच नागरिकांना होणारा त्रास तातडीने थांबवावा आणि कथित गैरप्रकारांना जबाबदार असलेल्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. 


आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली असली तरी नागरिकांच्या प्रश्नांवर माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. परिवहन अधिकाऱ्यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित तक्रारी व आरोपांची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
परिवहन विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे आवश्यक असून, नागरिकांच्या हितासाठी हा लढा पुढेही सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका शहाबाज पटेल यांनी व्यक्त केली.  यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चाँद शेख, श्रेयश भावसार, शोएब पटेल, आमिर राऊत तसेच पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top