नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानातील अतिरिक्त खर्चाची चौकशी करा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी; दोषी ठेकेदारांवर कारवाईचा इशारा


पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : नवीन पनवेल येथील दिलीप वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या राजीव गांधी मैदानावरील निकृष्ट कामामुळे झालेल्या कथित अतिरिक्त खर्चाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख दीपक रा. निकम यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.


नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानावर सुमारे ९ कोटी रुपये खर्च करून दिलीप वेंगसरकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमी उभारण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्यांसाठी मैदानावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. मात्र, उद्घाटनाला अवघे काही महिने उलटले असतानाच मैदानावरील गवत काढून नवीन गवत व रेती टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप निकम यांनी केला आहे.


विशेषतः नवीन हिरवळीच्या कामासाठी ९१ लाख ११ हजार ३८६ रुपयांच्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आल्याची माहिती असल्याचे निकम यांनी पत्रात नमूद केले आहे. काम आधी सुरू करून त्यानंतर मंजुरी घेण्याची ही पद्धत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात मैदानावरील गवताची निवड, लागवड आणि देखभाल यामध्ये त्रुटी राहिल्या असतील, तर त्याचा आर्थिक भार पनवेलकरांच्या कराच्या पैशातून का भरायचा, असा सवाल दीपक निकम यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी नियोजनातील चुकीमुळे अतिरिक्त खर्चात जात असल्यास त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


या प्रकरणात पहिल्या टप्प्यातील गवत व मैदानाचे काम करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का, निकृष्ट कामामुळे अतिरिक्त खर्च झाला असल्यास संबंधित ठेकेदाराकडून रक्कम वसूल केली जाणार आहे का, तसेच ठेकेदारावर कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, याबाबत महापालिकेने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 


नवीन हिरवळीच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेला ९१ लाख ११ हजार ३८६ रुपयांचा अतिरिक्त खर्च महापालिकेच्या तिजोरीतून का करण्यात आला, असा थेट सवालही निकम यांनी केला आहे. या कामास तांत्रिक मान्यता देणारे अधिकारी, सल्लागार आणि गुणवत्ता तपासणी करणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. 


पनवेलकरांच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा योग्य पद्धतीने आणि नियोजनपूर्वक वापर होणे आवश्यक आहे. चुकीच्या नियोजनामुळे महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दीपक निकम यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top