नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

टीपीएस-०६ वा रोड म्युनिसिपल गार्डन जवळ सांताक्रूझ पश्चिम,  येथील सार्वजनिक शौचालय तोडण्याचे आदेश रद्द करा; अन्यथा मनपावर मोर्चा काढणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इशारा; सहाय्यक आयुक्त पल्लेवाड यांना निवेदन

4kNews कामोठे

मुंबई प्रतिनिधी-(अजित मोहिते). 22  ऑगस्ट २०२६ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज एच/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त माननीय पल्लेवाड साहेब यांची भेट घेऊन टीपीएस-०६, म्युनिसिपल गार्डन परिसरातील महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय तोडण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन सादर केले. 



टीपीएस-०६ म्युनिसिपल गार्डन परिसरातील सार्वजनिक शौचालय हे भीमवाडा व खोतवाडी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक सुविधा केंद्र आहे. परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू रहिवाशांना या शौचालयाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून, ते पाडल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे विवेक पवार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.



सार्वजनिक स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा विचार करून सदर शौचालय तोडण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शौचालयाची आवश्यकता लक्षात घेऊन ते कायम ठेवण्याबरोबरच आवश्यक असल्यास त्याची दुरुस्ती व देखभाल महानगरपालिकेने करावी, अशीही भूमिका त्यांनी मांडली. 



“भीमवाडा आणि खोतवाडी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित हा प्रश्न आहे. सार्वजनिक शौचालय तोडण्याचे आदेश तातडीने रद्द करण्यात यावेत. अन्यथा भीमवाडा-खोतवाडी येथील रहिवाशांच्या वतीने मुंबई महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करून मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आपल्या निवेदनातून दिला.



यावेळी नागरिकांच्या समस्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन सार्वजनिक शौचालय पाडण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी सुनील बाळासाहेब सूर्यगंध, वॉर्ड अध्यक्ष, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top