पनवेल दि.16( प्रतिनिधी) ‘राज्यात रक्त न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचे पाहिले आहे. मात्र, पनवेल मध्ये अनेक रक्तदाते सामाजिक भान ठेवून कार्यरत आहेत. हे रक्तदाते युवक आपली खरी संपत्ती आहेत,’ असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी यांनी केले. कळंबोली येथे रामदास शेवाळे व उपमुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश शेवटी यांच्या

वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर आणि रक्तदाता सन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ या उक्तीप्रमाणे जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून शिवसेना पनवेल व रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ता. 15 रोजी या भव्य रक्तदान शिबिराचे आणि रक्तदाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष कार्यकारी अधिकारी
उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय मंगेश चिवटे यांच्या हस्ते आणि रामदास शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
कळंबोली सह परिसरातील शेकडो युवकांनी या रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. आयोजकांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. मंगेश चिवटे यांनी रक्तदान आणि दात्यांचा गौरव सोहळा कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

पनवेल शिवसेना व रामदास शेवाळे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक करत महाराष्ट्राच्या निरोगी आरोग्यासाठी उपमुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष अविरत सामाजिक कार्यात सक्रिय राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी कळंबोली शहराध्यक्ष तुकाराम सरक, निलेश दिसले, डीएन मिश्रा, विराट पवार, सुधीर ठोंबरे, सुभाष घाडगे,प्रेम डांगे, आनंदा माने,पंकज सूर्यवंशी, अभिजीत कोरपे, सिद्धेश म्हात्रे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
