नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

*‘आशा की किरण’ – माता व बाल आरोग्य विषयक प्रशिक्षण उपक्रम*

4कनेस्व कामोठे

पनवेल, दि. 22ऑगस्ट 2026
रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइटच्या सहकार्याने  *‘आशा की किरण – Samvaad on Maternal & Child Health’l* या विशेष प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. *“Healthier Mothers. Brighter Children. Stronger India.”*  या संदेशावर आधारित या उपक्रमाचा उद्देश आशा सेविकांना माता व बाल आरोग्याबाबत अद्ययावत माहिती व मार्गदर्शन देऊन त्यांच्या कार्याला अधिक सक्षम करणे हा होता. 



या प्रशिक्षण कार्यक्रमात *एकूण 120 आशा सेविकांनी* सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमातील तज्ज्ञ वक्ते:

* *डॉ. चित्रा कुलकर्णी* — बालकांचे पोषण व आहार (*Feeding in Infants and Children*)
* *डॉ. शिल्पा गांधी* — बालकांच्या विकासाचे निरीक्षण (*Developmental Monitoring*)
* *डॉ. शोभना पालेकर* — गर्भवती व प्रसूतीनंतरच्या महिलांचे पोषण (*Nutrition in Pregnant and Post Delivery Females*)
* *डॉ. स्वाती लिखिते* — लसीकरणाचे महत्त्व (*Importance of Vaccines*)



या उपक्रमाचे *प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन ध्वनी तन्ना* असून, *प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री. प्रकाश पाटील, आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल* यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने 120 आशा सेविकांना साड्या भेट देण्यात आल्या. तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइट या दोन्ही क्लबच्या वतीने सर्व आशा सेविकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.



यावेळी *इनर व्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या वतीने नेरे प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) यांना प्रत्येकी एक अशा एकूण दोन सेट्स पल्स ऑक्सिमीटर व BP उपकरणांचे वाटप करण्यात आले.* या उपकरणांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य तपासणीच्या सुविधांना बळकटी मिळणार आहे. यावेळी सर्व आशा सेविकांना मातृ व बाल आरोग्यविषयक प्रशिक्षण पुस्तिकेचेही वाटप करण्यात आले. या पुस्तिकेमध्ये माता व बालकांचे आरोग्य, पोषण, गर्भावस्था, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी तसेच बाल आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 



*रोटरी सदस्यांची उपस्थिती*
*रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी* तर्फे
*अध्यक्ष रोटेरियन भावेश रंगपरिया*, *रोटेरियन Cdr. दीपक जांबेकर* आणि *Secretary रोटेरियन ध्वनी तन्ना* उपस्थित होते.
*रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाइट* तर्फे
*अध्यक्ष रोटेरियन राजेश मेहता*, *रोटेरियन नवीन चौधरी* आणि *डॉ. शैलाश्री केळकर* यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला *डॉ. अपर्णा  पवार, तालुका आरोग्य अधिकारी*, यांची विशेष उपस्थिती लाभली. 



‘आशा की किरण’ या उपक्रमाच्या माध्यमातून आशा सेविकांना माता व बाल आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर सन्मान, आवश्यक आरोग्य उपकरणे आणि सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले. *निरोगी माता, निरोगी बालक आणि सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top