नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

मेयर मॅरेथॉनच्या आयोजनातील अनियमिततेची चौकशी करा  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेत्या लीना गरड यांची पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी

4kNews कामोठे
पनवेल, दि. 22 (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘मेयर मॅरेथॉन’च्या आयोजनात गंभीर अनियमितता, नियमभंग आणि आर्थिक पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्या तथा नगरसेविका लीना अर्जुन गरड यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेची मान्यता न घेता मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचा दावा गरड यांनी केला आहे. तसेच मॅरेथॉनच्या आयोजनासाठी खाजगी संस्थेची निवड टेंडर प्रक्रियेविना करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांसाठी नियमानुसार निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. 


मॅरेथॉनच्या ‘प्रवर्तक’ पदावर आमदाराचे भाऊ परेश ठाकूर, स्वीकृत नगरसेवक, यांची नियुक्ती करण्यात आल्याचा दावा करत गरड यांनी या नियुक्तीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष किंवा प्रभाग समिती अध्यक्ष यांसारखे अधिकृत पद नसताना संबंधित व्यक्तीची प्रवर्तक म्हणून नियुक्ती कोणत्या अधिकाराने करण्यात आली, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेसह स्थायी समिती, प्रभाग समिती तसेच महिला व बालकल्याण समितीची मान्यता घेण्यात आली आहे का, याबाबतही स्पष्टता आवश्यक असल्याचे गरड यांनी म्हटले आहे. 


मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून प्रवेश शुल्क आकारले जात असून, हा निधी थेट खाजगी संस्थेकडे जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शुल्काची एकूण रक्कम, त्याचा हिशेब, खर्चाची पद्धत आणि महापालिकेच्या निधीशी त्याचा संबंध याबाबत पारदर्शकता नसल्याचे गरड यांनी निवेदनात नमूद केले आहे.


या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करून टेंडरशिवाय खाजगी संस्थेची निवड का करण्यात आली, अपात्र व्यक्तींना प्रवर्तक पद का देण्यात आले आणि प्रवेश शुल्काचा आर्थिक व्यवहार नेमका कसा झाला, याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 


तसेच प्रवेश शुल्काची संपूर्ण आर्थिक माहिती जाहीर करून संबंधित रक्कम महापालिका निधीत जमा करावी आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी लीना गरड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top