नवीन बातम्या
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

4kNews कामोठे दि. 6
पनवेल/प्रतिनिधी — आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे जिल्हा परिषद शाळेत वह्यांचे वाटपपनवेल:पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करंजाडे येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे येथील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम आज, बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला.



आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा दिल्या. याच पार्श्वभूमीवर करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी करंजाडे गावचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, सदस्य अतिष साबळे, माजी सदस्य नाथा भरवाड, भाजप करंजाडे शहर महिला  अध्यक्षा सुषमा मयेकर, शर्वरी पोईपकर, तसेच उमेश भोईर, केतन आंग्रे, ओमकार चौधरी, मुख्याध्यापक दिगंबर जाधव साहेब आणि शिक्षक वर्ग यांसह इतर मान्यवर, ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top