नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

खारघरमध्ये १२ कोटी ४० लाखांच्या निधीतून दैनंदिन बाजारांची निर्मिती
पनवेल महापालिकेमार्फत खारघरचा विकास गतिमान — माजी सभागृहनेते परेश ठाकूर


4k समाचार दि. 15
पनवेल (प्रतिनिधी) सिडकोने खारघर परिसराचा अपेक्षित पद्धतीने विकास न केल्यामुळे नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना अनेक मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता. सिडकोकडून सर्व सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा होती, मात्र ते शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि महापालिकेच्या माध्यमातून आता खारघर शहरात वेगाने आणि नियोजनबद्ध विकास होत असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले.



ते खारघरमध्ये आयोजित दैनंदिन बाजारांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोलत होते. या बाजारांची निर्मिती आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकारातून करण्यात येत असून एकूण १२ कोटी ४० लाख २३ हजार ६९१ रुपयांच्या निधीतून खारघरमधील १५ भूखंडांवर दैनंदिन बाजार उभारले जाणार आहेत. या कामांचे भूमिपूजन माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. 

यावेळी खारघर शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, गुरुनाथ गायकर, निलेश बाविस्कर, नरेश ठाकूर, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, कीर्ती नवघरे, उपाध्यक्ष संजय घरत, समीर कदम, प्रभाग क्रमांक ६ चे अध्यक्ष वासुदेव पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, शहर उपाध्यक्ष अजित अडसूळ, अमर उपाध्याय, खारघर शिवसेना अध्यक्ष प्रसाद परब, भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा साधना पवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष नितेश पाटील, प्रवीण बेरा तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top