नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

4kNews कामोठे
पनवेल, दि.१३ (वार्ताहर) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या आदेशानुसार संतोष शरद पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (एससी विभाग) जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..


पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. श्रुतीताई शाम म्हात्रे यांच्या हस्ते संतोष पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मा.नगरसेविका शशिकला सिंग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीमुळे पनवेल शहरातील अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, तसेच पक्षाची भूमिका आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला..


नियुक्तीनंतर संतोष पवार यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, संघटन मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्धपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top