चोरीच्या गुन्ह्याचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या एका मोलकरणीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. वनिता उर्फ आशा शैलेंद्र गायकवाड असे या मोलकरीणचे नाव आहे

. वनिता ही श्रीमंतांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करता करता एका आठवड्यात घरातील मौल्यवान वस्तु, रोकड चोरी करून पसार होते. वनिता हिच्यावर मुंबई, ठाणे, नवीमुंबई ५० पेक्षा अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

वनिताने चोरीच्या गुन्ह्यातून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली असून ती प्रत्येक वेळी राहण्याचे ठिकाण बदलते अशी माहिती समोर आली आहे.
