नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवा नोडमध्ये दिनांक २३ ते २५ जानेवारी पर्यंत होणाऱ्या ‘नमो चषक’ क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. २०) उलवा नोड येथे नमो चषक स्पर्धास्थळी अंतिम आढावा बैठक पार पडली.



  पनवेल आणि उरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो चषक २०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात आयोजनातील विविध समित्यांची बैठक पार पडली. या बैठकीस उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, भाजपचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उलवा नोड अध्यक्ष अमर म्हात्रे, विजय घरत, भार्गव ठाकूर, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, सागर ठाकूर, कबड्डी प्रशिक्षक सुर्यकांत ठाकूर, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर,

शरीरसौष्ठवपटू दिनेश शेळके, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, ज्योत्सना ठाकूर,  स्वप्नील ठाकूर, रोहित जगताप,  किशोर पाटील,  अंकुश ठाकूर, व्ही.के. ठाकूर, मदन पाटील, सुधीर ठाकूर, दिनेश खानावकर, रोहित जगताप, सुहास भगत, जयवंत देशमुख, हेमंत ठाकूर, धीरज उलवेकर, गौरव कांडपिळे, नाना देशमुख, सीमा पाटील, यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.



  नमो चषकच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या १७ समिती स्थापित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने या समितीकडून आपापल्या कामाचा आढावा घेण्यात आला. उत्कृष्ट आणि भव्य आयोजनातून हा नमो चषक यशस्वीपणे करण्यासाठी समितीमधील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केली. दरम्यान त्यांनी येथे होणाऱ्या स्पर्धेच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी केली. तसेच मार्गदर्शक सूचना केल्या.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top