नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे यतीन देशमुख प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक

4k समाचार
पनवेल दि.19 (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून ते निवडणुकीला उभे राहिल्यास महायुतीच्या प्रस्थापित नगरसेवकांना प्रभाग १६ मधून तगडे आवाहन उभे राहणार आहे.  


  यतीन देशमुख हे पनवेल महापालिकेच्या २०१७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत सुद्दा उभे होते. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तरी देखील यतीन देशमुख हे मागे हटले नाहीत. गेल्या ८ वर्षात त्यांनी आपला जनमानसात आधार आणखी वाढवला आहे. यतीन देशमुख वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधकांना धारेवर धरत महाविकास आघाडीचा पर्याय जनतेसमोर घेऊन जात आहे. सत्ताधाऱ्यांनी आपली एकाधिकार शाहीमुळे विरोधकही त्यांच्यामागे गेले. 

मात्र यतीन देशमुख यांनी ठोसपणे विरोधकांची भूमिका निभावत महाविकास आघाडीद्वारे सत्ताधाऱ्यांची वेगवेगळ्या प्रश्न मांडून वेळप्रसंगी आंदोलन उभारून कोंडी केली. सध्या पनवेल महापालिकेत अपुरा पणी पुरवठा, खराब रस्ते, वाढीव मालमत्ता कर, वाहतुक कोंडी, पार्किंगसाठी अपुरी सुविधा, १५ वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित बस डेपोचे सुधारीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन, फुटपाथ वरील अतिक्रमण, महापालिकेत जोडलेल्या गावांचे मूलभूत सुविधा, भ्रष्टाचार असे विविध प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र ठोस विरोधक नसल्यामुळे ते प्रश्न सुटत नाही. तसेच राज्यात झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात त्यांनी अग्रेसर राहून सहभाग नोंदवला. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा यतीन देशमुख उभे राहिल्यास महायुतीला प्रभाग १६ मध्ये तगडे आवाहन उभे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top