पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : उलवे परिसरातील असलेल्या तलावातील पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध उलवा पोलीस करीत आहेत

सदर महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, केस लहान काळे (विखुरलेले), डोळे उघडया स्थितीत, तोंड उघडे व जीभ बाहेर आलेली, चेहरा गोल, बांथा मध्यम, नेसणीस गडद निळा रंगाचा कुर्ता त्यावर फुलांची डिझाईन

असलेली, फिकट लाल रंगाचा गमचा सदृश्य टॉवल, काळी तपकिरी लाल रंगाची फुला- फुलांचा पायजमा आणि डाव्या पायात एक निळ्या रंगाची स्लिपर घातलेली आहे. या महिला बद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी उलवा पोलीस ठाणे मो. ८६६९७८९१०० किंवा सहा. पोलीस निरीक्षक अजित कणसे यांच्याशी संपर्क साधावा .
फ
